Breaking


जुन्नर येथे स्व शिवाजीराव काळे पूर्णाकृती पुतळा अनावरण व कृषी उत्पन्न बाजार समिती सुवर्णमहोत्सव समारंभ संपन्न


जुन्नर /आनंद कांबळे : सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव तथा दादासाहेब काळे यांचे सहकारातील योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. 


जुन्नर येथे स्वर्गीय शिवाजीराव काळे पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुवर्णमहोत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. 


यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे, आमदार अतुल बेनके, संजय जगताप, अशोक पवार, दिलीप मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद सोनवणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सभापती ऑड संजय काळे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष धनराज खोत, महिला जिल्हा उपाध्यक्षा उज्वला शेवाळे, शरद लेंडे, अंकुश आमले, सचिव रुपेश कवडे, आगरचे सरपंच नयना तांबे, उपसरपंच अन्वर पठाण, तुकाराम गायकर, विजय कबाडी, सुभाष कवडे, बाळासाहेब मुरादे, संजीव गोसावी, सुनील ढोबळे यांसह बाजारसमितीचे संचालक, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांचे संचालक, सचिव, जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
यावेळी खासदार शरद पवार यांच्या हस्ते श्री शिवछत्रपती महाविद्यालय येथे उभारण्यात आलेल्या पद्मविषभूषण खासदार शरदचंद्रजी पवार इनडोअर स्पोर्ट्स हॉलचे उदघाटन व कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या मुख्य आवारात उभारण्यात आलेल्या दादासाहेब काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 


याप्रसंगी खासदार पवार म्हणाले की, शिवाजीराव काळे हे समाजवादी विचारांचे नेतृत्व होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून तालुक्याच्या जनतेने प्रचंड पाठिंबा देऊन शिवाजीराव यांना विधानसभेत पाठवले. संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही व्यक्ती 55 वर्षे इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी सहकारात निवडून आलेले नाही याला अपवाद केवळ शिवाजीराव काळे हे आहेत. 

यावेळी ऑड संजय काळे म्हणाले की, शेवटच्या श्वासापर्यंत स्वर्गीय शिवाजीराव काळे हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या सहकारातील योगदाना बद्दल सहकारातील प्रत्येक कार्यकर्त्यांची त्यांचा पुतळा उभारावा अशी इच्छा होती. व या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाला हा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या व काळे कुटुंबासाठी सर्वात महत्वाचा क्षण आहे.  राज्यातली चार क्रमांकाची बाजारसमिती म्हणून जुन्नर बाजारसमितीचा नावलौकिक आहे. 


आमदार अतुल बेनके म्हणाले की, भविष्यात मार्केट निवडणूक बिनविरोध झाली नाही तरी काळजी करू नका. आपण सर्वजण एकत्र लढणार आहोत. बाजार समितीच्या वतीने 30  रुपयात शरदचंद्रजी पवार थाळी सुरू करण्यात येणार आहे. 

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, मार्केट कमिटी चालू राहिली नाही तर शहरात शेतमाल जाणार नाही. राज्यातील मार्केट कमिटी सक्षम करण्यासाठी 2000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कोरोना काळात मार्केट कमिटीने मोलाचे काम केले आहे. पुणे जिल्ह्यात अद्यापही जुन्नर आंबेगाव शिरूर कोरोनाच्या दृष्टीने अडचणीचे आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा