Breaking

२७ सप्टेंबर देशव्यापी बंद यशस्वी करण्याचे बीड जिल्ह्यातील डाव्या पक्षांचे आव्हान


बीड (अशोक शेरकर) : देशातील विविध शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे मागे घ्या, या मागणीला घेऊन मागील नऊ महिन्यापासून दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. 


हा बंद बीड जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी डाव्या पक्षांच्या आघाडीची बैठक शनिवारी (ता.11) केज येथे शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी भाकपचे जेष्ठ नेते कॉ. नामदेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली संपन्न झाली. 


या बैठकीत २७ सप्टेंबरचा भारत बंद यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष पक्ष व संघटनांना सोबत घेऊन केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे वापस घ्या, विज बिल विधेयक वापस घ्या, कामगार विरोधी कामगार कायदे रद्द करा, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना २०२० चा पीक विमा लागू करावा, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा, गॅस पेट्रोल डिझेल भाववाढ कमी करा, या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन पी एस घाडगे, कॉ. नामदेव चव्हाण, भाई मोहन गुंड, कॉ. दत्ता डाके, पांडुरंग राठोड, ऍड. अजय बुरांडे कॉ ज्वोतिराम हुरकुडे यांनी केले.


यावेळी कॉ. महादेव नागरगोजे, नारायण गोले पाटील, सय्यद याकुफ, कॉ. भाऊराव प्रभाळे, कॉ. राजकुमार कदम, कॉ मोहन लांब, कॉ अशोक थोरात, नवनाथ जाधव, अशोक रोडे, अनिल कदम, अमोल सावंत, सुमंत उंबरे, राम हरी मोरे, विलास मुंडे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कृषी कायद्याच्या विरोधात असणाऱ्या सर्वच पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा