Breakingखेड सेझ १५ टक्के परतावा प्रश्नाबाबत एमआयडिसी सकारात्मक !


खेड : एमआयडीसी कार्यालय, अंधेरी, मुंबई येथे खेड सेझ प्रकल्पबाधित पंधरा टक्के परतावा धारक शेतकरी प्रतिनिधींसमवेत संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीचबैठक संपन्न झाली. 


एमआयडीसी कार्यालयाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरोख मुकादम, उमेश देशमुख, रंगा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलग साहेब, प्रादेशिक अधिकारी पुणे, संजीव देशमुख हे उपस्थित होते.

       
सद्य:स्थितीमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या के. डी .एल. (खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी) च्या जमिनीच्या विक्री जाहिरात, के.ई.आय.पी.एल. अंतर्गत करण्यात आलेल्या सामंजस्य करार, के.डी .एल. च्या नावे ट्रान्सफर होणाऱ्या जमीन हस्तांतरण,  एम. आय. डी .सी .च्या माध्यमातून लवकरात लवकर मुख्यमंत्री कार्यालयात संयुक्त बैठक घेणे, के. ‌डी. एल. च्या नावे हस्तांतरित होणाऱ्या जमिनीचा सामंजस्य करार याचा आधार घेऊन खाजगी पातळीवर कोणत्याही प्रकारे व्यवहार न होता. एम.आय.डी.सी.चे नियंत्रण अंतर्गत  निर्णय होणे, यावर सविस्तर चर्चा झाली.

वरील सर्व गोष्टी एम.आय.डी.सी अधिकाऱ्यांनी समजून घेतले, असून या अनुषंगाने त्वरित योग्य कार्यवाही होईल. एम. आय. डी. सी. शेतकरी हिताचाच विचार करेल. शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे पंधरा टक्के परतावा प्रश्न लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना मध्ये निर्माण झाली आहे.

    
शेतकर्‍यांच्या वतीने एम.आय.डि.सी. अधिकाऱ्यांबरोबर बैठकीस उपस्थित प्रतिनिधींमध्ये काशिनाथ हजारे, निलेश म्हसाडे, विश्वास कदम, भानुदास नेटके, अंकुशराव कांन्हूरकर, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, ऋषी चव्हाण, अतिश कान्हूरकर या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या वतीने भूमिका मांडली. बैठकीच्या शेवटी शेतकरी प्रतिनिधींच्या वतीने निवेदन देण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा