Breaking

मोफत ऑनलाईन वधूवर परिचय मेळावा


परिवर्तन आंतरजातीय विवाह केंद्रातर्फे आंतरजातीय विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी रविवार दि. 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत मोफत ऑनलाईन वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे असे आयोजकांनी आवाहन केले आहे. नोंदणी पूर्णपणे मोफत आहे.


जातीव्यवस्था नष्ट होण्यासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे आहेत. राज्यभरातून विविध जातींतील मुले मुली विवाह करण्यासाठी जाती धर्माच्या पलीकडे विचार करत आहेत व आमच्याकडे नोंदणी करत आहेत. विविध संशोधनांतून हे दिसून झाले आहे की आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांची मुले अनेक क्षेत्रांत इतर मुलांपेक्षा सरस असतात. याउलट नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांच्या मुलांमध्ये शारीरिक किंवा मानसिक व्यंग असण्याची किंवा ते बळावण्याची शक्यता जास्त असते. जितक्या भिन्न जाती एकत्र येतील तितके त्यांचे अपत्य जास्त सक्षम असेल.


आंतरजातीय विवाहांची चळवळ वेगाने पुढे जाणे सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक झाले आहे. या जात जाणीवेतूनच अमानुष अशी शोषण व्यवस्था तयार झाली आहे आणि भारतीय ही ओळख पुसट झाली आहे. 

जात निर्मूलनासाठी केवळ रोटी व्यवहार करुन चालणार नाही तर बेटी व्यवहार ही व्हायला हवा ज्यामुळे जातीय अस्मिता लयास जाण्यास मदत होऊन जातीअंताकडे जाण्यासाठी समाजमन तयार होईल. आंतरजातीय कुटुंबव्यवस्था आदर्शपणे उदयोन्मुख होइल. मानवी मुल्य जोपासना वाढीस लागेल. त्यामुळे अधिकाधिक तरुण तरुणींनी या मेळाव्याचा लाभ घेऊन आपला अनुरूप जोडीदार शोधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


इच्छुकांनी नोंदणीसाठी खालील नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे :

सचिन - 8600929360
कौस्तुभ - 9011891964
आशा - 7350016571
इनायत - 9881808043कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा