Breaking


मुंबई हादरली : मुंबईतील "त्या" बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू


मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात रॉड टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 


पीडित महिलेची प्रकृती गंभीर होती, तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यात महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबई हादरली आहे. नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला अटक केली असून वांद्रे कोर्टाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.


दरम्यान, या बलात्कार प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 


या प्रकरणावर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करून म्हटले आहे की, साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली, माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही, पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना नाही वाचवू शकलो तुला, अस वाघ यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा