Breakingवणी येथे आशा स्वयंसेविकांच्या सिटू च्या नेतृत्वात देशव्यापी संपनिमित्त धरणे व निदर्शने


केंद्र सरकारच्या कामगार धोरणाच्या विरोधात देशव्यापी संप


वणी : केंद्र सरकारचे कामगार धोरणांच्या विरोधात वणी येथे सिटू संलग्न आशा वर्कर संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर दानव व सचिव प्रीती करमणकर यांचे नेतृत्वात वणी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.


आशा वर्कर, योजना कर्मचाऱ्यांना  सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जा द्या, किमान समान वेतन देण्यात यावे, कोरोना कामाचा बंद केलेला भत्ता चालू करावा, कामगार विरोधी नवीन कायदे रद्द करावीत, योजना कर्मचाऱ्यांना समान वागणूक देऊन त्यांची प्रताडणा थांबवावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.


आंदोलन कुंदा देहारकर, मेघा बांडे, चंदा मडावी, पल्लवी पिदूरकर, प्रतिभा लांजेवार, अनिता जाधव यांच्यासह आशा वर्कर्स मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा