Breaking

अभयारण्य क्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या जमिनी वर सरकारचे नाव लावण्यास विरोध - सुशिलकुमार चिखले


अकोले
 : कळसुबाई, हरिशचंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर सरकारचे नाव लावून जमीन मालकांच्या नावांची नोंद इतर हक्कात करण्याची कारवाई त्वरित थांबवावी व मूळ जमीन मालकांच्या नावांच्या नोंदी कायम करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. 

सध्या सुरू असणारी अन्यायकारक कारवाई न थांबविल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.


चिखले म्हणाले की, हरिश्चंद्रगड व कळसुबाई अभयारण्यातील एकूण 32 गावांचे एकूण क्षेत्र 361.81 चौ.कि.मी. शेतजमिनीवर आदिवासींचे मालकी हक्क संपुष्टात आणण्याची कार्यवाही सरकारने चालविलेली आहे. त्यामुळे आदिवासींचे आणि इतर शेतकऱ्यांचे जमिनीवरील हक्क कमी होवून त्यांची नोंद इतर हक्कात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज, सरकारी कर्ज व इतर व्यवहार बंद होणार आहेत. व या नोंदीमुळे येथील शेतकऱ्यांवर भुमिहीनचे होण्याचे मोठे संकट ओढवणार आहे. त्यामुळे तालुक्यातील राजूर व भंडारदरा वन्यजीव क्षेत्रातील असलेल्या 32 गावामधील 7/12 उताऱ्यावर असलेल्या खाजगी व्यक्तींची नावे कमी करू नये व त्या उताऱ्यावर महाराष्ट्र शासन संरक्षित वन जमिन अशी नोंद करू नये.


ते पुढे म्हणाले की, ब्रिटीशानी भंडारदरा धरण बांधले होते, त्यावेळी पुनर्वसन कायदा नसल्यामुळे जंगल जमिनी ह्या शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिलेल्या होत्या. ती महाराष्ट्र सरकारने सन 1962 साली मालकी हक्काने शेतकऱ्यांकडून मोबदला घेवून देण्यात आलेली आहे. व सदर जमिनी कायमस्वरुपी वहिवाटीला देवून संबंधित शेतकऱ्यांच्या नावे दिलेल्या होत्या, असे असताना जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी आदेश काढला आहे व सन 2020 साली कायदयाची अंमलबजावणी कोणत्याही लोकप्रतिनिधी ला विश्वासात न घेता सरकार करीत आहे.


वरील 24 गावांमध्ये पेसा कायदा लागू असून कोणत्याही कायदयांची अंमलबजावणी करण्यापूर्वी पेसा अंतर्गत ग्रामपंचायतींची मंजुरी घेण्याची गरजेचे असते. असे झाल्याचे दिसून येत नाही. म्हणून 32 गावांतील शेतकऱ्यांची मागणी आहे की, सरकारने एकतर्फी काढलेला शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा. व आमची मुळ मालकी असलेली नोंद कायम करण्यात यावी. अन्यथा मोठया प्रमाणात शेतकरी आंदोलन करतील याची नोंद घ्यावी असा इशारा चिखले यांनी दिला.

● अभयारण्यात येणारी गावे :

पेडशेत, पांजरे, उडदावणे, घाटघर, शिंगणवाडी, मूरशेत, साम्रद, रतनवाडी, कोलटेंभे, शिरपुंजे खुर्द, शिरपुंजे बु, तेरुंगण, कुमशेत, पाचनई, लव्हाळी कोतुळ, लव्हाळी ओतूर, कोथळे, तळे, फोपसंडी, विहीर, सोमलवाडी, पळसुंदे, सातेवाडी ,मोरवाडी, अंबित .
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा