Breaking

...अन्यथा आंबेगाव पंचायत समितीवर जनावरांसह मोर्चा काढू; किसान सभेचा इशारा


घोडेगाव : आंबेगाव पंचायत समितीवर जनावरांसह मोर्चा काढण्याचा इशारा आंबेगाव तालुका किसान सभेच्या वतीने गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


निवेदनात म्हटले आहे, पशूधन हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत मौल्यवान असते. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात काही दिवसांपासून जनावरांना विविध साथीचे आजार होत आहेत. यामध्ये जनावरांच्या अंगावर गाठी येणे, डोळे पांढरे होणे, चारा न खाणे असे विविध आजार जनावरांना होत आहेत. परंतु पशुसंवर्धन विभागाने केलेले दुर्लक्ष व आदिवासी भागातील पशुवैदकीय दवाखाने नीटपणे सुरू नसणे याचा एकत्रित फटका आदिवासी भागातील शेतकरी बांधवांना होत आहे.


■ निवेदनातील मागण्या पुढीलप्रमाणे : 

1. आदिवासी भागातील जनावरांना विविध आजारांनी वेढले असताना गावोगावी विशेष शिबिरे घेऊन जनावरांची तपासनी करून योग्य ते उपचार त्वरित करावेत.

2. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील पशुवैद्यकीय दवाखाने नियमित सुरू असावेत. व तिथे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असावेत.

3. कोरोनाच्या काळात शेतकरी वर्ग संकटात असल्याने त्याचे पशुधन हे त्या कुटुंबाचे आधार आहेत. त्यामुळे हे पशुधन वाचवणे व अशा संकटाच्या काळात तातडीने शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाने सहकार्य करावे.


वरील मागण्यांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास ही आजारी जनावरे घेऊन पंचायत समितीवर, जनावरांसह मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी व तालुका कार्यकारणी सदस्य दत्ता गिरंगे हे उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा