Breakingपिंपरी चिंचवड : घरकुल येथे कॅन्सर चिकित्सा शिबिर


पिंपरी चिंचवड : लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रीसर्च सेंटर चिंचवड पुणे, मिशन फाॅर व्हीजन फौडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या सयुंक्त विद्यमाने घरकुल येथे महिलांच्या कॅन्सर  व नाक कान घसा या बाबत मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले.


या कार्यक्रमाचे उद्धाटन माधव पाटील यांचे हस्ते झाले. या शिबिरात 62 महिलांचे कॅन्सरचे चेकअप झाले व 60 नागरिकांनी नाक कान घसा तपासणी करून घेतली. 

या शिबिरासाठी अंबादास बेळसांगवीकर, विकासराजे केदारी, अशोक मगर, संतोष माळी प्रेमा शेट्टी व प्रविण बहिर यांनी परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा