Breaking


पिंपरी चिंचवड : धार्मिक स्थळे उघडण्यासाठी मनसेचा आकुर्डीत घंटानाद


पिंपरी
 : कोरोना संसर्ग कमी झाला आहे. नियमही शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळेही दर्शनासाठी खुली करावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आकुर्डीतील खंडोबा माळ येथे घंटानाद व धरणे आंदोलन केले.

 

ब्रेकींग : CET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक


महापालिकेतील मनसे गटनेते सचिन चिखले, महिला सेना शहराध्यक्षा अश्विनी बांगर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, जनहित विभाग शहराध्यक्ष राजू भालेराव, चित्रपट सेना शहराध्यक्ष दत्ता घुले यांनी नेतृत्व केले. रूपेश पटेकर, राहुल जाधव, सीमा बेलापूरकर, अनिता पांचाळ, सुमीत कलापुरे, विक्रम आढे , वाहतूक सेनेचे सुशांत साळवी, शिवकुमार लोखंडे, महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे नीलेश नन्नवरे, भरत क्षेत्र आदी सहभागी झाले होते.


सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवले आहेत. मात्र, राजकीय पक्षांना कार्यक्रम घेण्यासाठी कुठलेही बंधन नाही. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. जुन्नर व आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचेच कार्यक्रम झाले, शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचे भरगच्च मेळावे सुरू आहेत. अशा कार्यक्रमांवर सरकारचे कोणतेही बंधन नाहीत, अशी टीका चिखले यांनी केली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा