Breaking


पिंपरी चिंचवड : कामगारांच्या हक्काच्या निधीवर मोदी सरकारचा डल्ला - काशिनाथ नखाते


पिंपरी : देशभरातील कष्टकरी कामगारांनी आयुष्यभर राबराब राबायचे आणि उतारवयात मदत होईल म्हणून भविष्य निर्वाह निधी जमा करायचे. मात्र, मोदी सरकार आता या भविष्य निर्वाह निधीवर ही डल्ला मारून त्यांच्या पैशाची लूट करणार आहे, अशी आधीसूचना  काढण्यात आली आहे. ज्या कामगारांच्या खात्यावरील वर्षीक ठेव अडीच लाखाच्या पुढे आहे, त्यांच्या ठेवीवर मिळणारे व्याज कर पात्र ठरणार आहे. देशातील कष्टकरी कामगार यांच्या तुटपुंज्या निधीवर अशा प्रकारचा निर्णय घेणे म्हणजे अन्यायकारक असून कामगारांच्या हक्कावर डल्ला मारण्यासारखी वाईट परिस्थिती देशावर आलेले आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे, असे मत कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. 


कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आयोजित  चिंचवड बैठकीत ते बोलत होते. वेळी उपाध्यक्ष भास्कर राठोड, राजेश माने, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, अर्चना कांबळे, विनोद गवई, सूरज शिंदे, अर्जुन सोनवणे आदीसह कामगार उपस्थित होते.


केंद्र सरकारने अन्यायकारक कामगार कायदे आणून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला, उरलेसुरले कामगार आहेत. त्यांचेही वाटोळे करण्याचा प्रकार दिसत आहे देशामध्ये पंधरा कोटी पेक्षा अधिक खातेदार हे पीएफ भरणार आहेत, सध्याच्या स्थितीमध्ये एक तर काम मिळत नाही. मिळाल तर टिकत नाही आणि वर्षानुवर्षे एखाद्या आस्थापनांमध्ये काम करून आपल्या भविष्यासाठी जो निधी जमा केलेला आहे. त्यावरच त्यांचं उतारवयात जगणं अवलंबून असते. सध्या आर्थिक समस्या भयानक असून सध्या अडीच लाखाची मर्यादा आहे, ही हा डाव यशस्वी झाल्यानंतर भविष्यामध्ये ही कमी रकमेवर सुद्धा व्याज लागण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
 
सरकारला विविध मार्गाने इतका मोठा निधी मिळत असताना सुद्धा कामगारांच्या पैशावर का डोळा आहे, हे लक्षात येत नाही. एक तर कामगारांची संख्या मुळातच कमी झालेले आहे आणि उरल्यासुरल्या कामगारांवर ती अशा प्रकारचे अन्याय करत असेल तर देशातील कामगार येणाऱ्या कालावधीमध्ये सरकार समोर तीव्र आंदोलन करतील, यात काही शंका नाही. पीएफवर कर अकारणी हा कोणत्याही कामगारांना परवडणारा नाही. देशातील कामगार वर्ग यापुढे या विरोधात तीव्र आंदोलन करतील, असेही नखाते म्हणाले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा