Breaking


पिंपरी चिंचवड : गणपतीदान व संकलन मोहिमेस प्रतिसाद !


पिंपरी चिंचवड : संस्कार प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करोनाचा प्रादुर्भाव असतानाही गणेशभक्तांच्या सोयीसाठी अडीच दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी संस्कार प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड मनपाने केलेल्या आव्हानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने २ गाड्या गणपतीदान व संकलन करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.


थेरगाव पुल घाट चिंंचवडगाव येथे घाटावर १ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती ५ गाड्या फिरत्या ठेवल्या होत्या. थेरगाव पुल घाटावर २२५ भाविकांनी मुर्तींचे दान दिले.


संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विसर्जनाच्या सहाही दिवशी वेगवेगळ्या टिम तयार करुन प्रत्येक टिमला जबाबदारी दिली आहे. ब प्रभाग स्थापत्य विभागातील सर्व अधिकारी, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी तसेच आज दिड दिवसाची जबाबदारी अनुषा पै यांनी उत्तमरित्या पार पाडली.

दान घेतलेल्या मुर्तींचे विनोदेवस्तीवरील तळ्यावर गेल्यानंतर विधीवत विसर्जन केले. यामध्ये ब प्रभाग अधिकारी सोनम देशमुख, ड प्रभाग अधिकारी उमाकांत गायकवाड, डॉ. मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शब्बीर मुजावर, मनोहर कड, रमेश भिसे, अरुण कळंबे, प्रदिप साळुंखे, जितेंद्र जाधव, सतिश उघडे, शुभम खरपुडे, अक्षय खरपुडे यांनी सहभाग घेतला होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा