Breaking


पिंपरी चिंचवड : घरकुल मध्ये श्वानदंश, भटक्या कुत्र्यांचा अहोरात्र धुमाकूळ


पिंपरी चिंचवड : चिखली येथील घरकुल परीसरात नागरिक भटक्या कुत्र्यांमुळे भयभीत झाले आहेत. अनेक बिल्डिंगच्या आडोश्याला, भाजीमंडई परिसरात ही कुत्री भटकत असतात. आसपास च्या परिसरातील अनेक भटकी कुत्री येथे गटागटाने येण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी गोरगरीब कामगार वर्ग बहुसंख्य आहे.रात्र पाळी वरून येणाऱ्या कामगारांच्या मागे ही कुत्री चावा घेण्यासाठी मागे लागतात. या परिसरात त्यांना खाद्य मिळत असल्याने कुत्रांच्या विविध टोळ्यात खुनी मारामाऱ्या सुरू असतात. चित्र विचित्र आवाज, श्वान रुदनामुळे लोक भयभीत होत आहेत. या ठिकाणी रात्री एका कुत्र्याने गस्तीवरील सुरक्षागार्डचा चावा घेतला आहे.


सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी सांगितले की, आम्ही सारथी हेल्पलाईनला तक्रार नोंदवली आहे. पण अद्यापही कारवाई नाही,मनपाने पिंजरे आणून येथील सर्व कुत्री पकडून न्यावीत. येथे रात्री बेरात्री 50 हुन जास्त कुत्र्यांची झुंड दहशत पसरवत फिरत असते, तसेच भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करणारी यंत्रणा विकसित करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा