Breakingपुणे : चाकण शहरातील वाहतुक सुळरित होण्यासाठी रिक्षा स्टॅन्डला मान्यता द्या : बाबा कांबळे


चाकण : एमआयडीसी व प्रस्तावित विमानतळ यामुळे चाकण परिसरात नागरीकरण वाढले आहे. मेट्रो चाकण पर्यंत धावणार आहेत यामुळे पुणे जिल्ह्यात तिसरी महानगरपालिका या परिसरात प्रस्तावित आहे. नवीन रिक्षा परवाना धोरणामुळे रिक्षांची संख्या वाढली आहे. रस्ते अपुरे पडत आहेत, चाकण येथे होणारी वाहतूक कोंडी हा प्रश्न सोडवणे महत्वाचे आहे. चाकण शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नवीन रिक्षा स्टॅन्डला मान्यता दिल्यास लाईन मध्ये रिक्षा लागतील. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल यामुळे नवीन रिक्षा स्टँड ला तातडीने मान्यता मिळणे आवश्यक आहे, परंतु वाहतूक कोंडीचे कारण पुढे करुन फक्त रिक्षाचालकांना लक्ष केले जात आहे. रिक्षाचालकांना टार्गेट करून त्यांच्यावर कारवाई केल्यास तसेच नवीन रिक्षा स्टॅन्डला मान्यता न दिल्यास रिक्षाचालक मालकांच्या वतीने तिव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला आहे.


चाकण येथे रिक्षाचालक मालक यांच्या बैठकीत ते बोलत होते महाराष्ट्र रिक्षा पंचायत सलग्न प्रहार रिक्षा स्टँडच्या वतीने चाकण शहरातील रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक नाणेकरवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी नाणेकरवाडीचे सरपंच रावसाहेब नाणेकर, उपसरपंच गणेश पवार, सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव, कष्टकरी जनता आघाडीच्या महिला अध्यक्षा अनिता सावळे, सामाजिक कार्यकर्त्या सुलोचना जाधव, अंबेगाव चाकण विभागाचे कैलास कुचेकर, अजिज शेख, शिक्रापूर चाकण विभागाचे अध्यक्ष कैलास नाना वलांडे, उपाध्यक्ष राजू शिंदे, विकी आंबेकर, अतुल नाणेकर, रिक्षा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे आदी उपस्थित होते.

या वेळी रिक्षा चालक मालकांनी विविध प्रश्न पोलिसांकडून होणारी सतत ऑनलाईन कारवाई व इतर विविध प्रश्न मांडले. यावेळी खेड तालुका अध्यक्षपदी सुनील जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र बाबा कांबळे यांच्या हस्ते सुनील जाधव यांना देण्यात आले.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी दीपक कुसाळकर, विकास तिकोने, गणेश सांडभोर, संतोष नाणेकर, रतन कांबळे, प्रवीण नावेकर, मयुर मेदेनकर यांनी परिश्रम घेतले.

खेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, बाळासाहेब ढवळे यांनी सूत्रसंचालन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा