Breaking

पुणे : ३ लाख ३० हजार किंमतीची ११ तोळे वजनाची सोन्याची चैन पळवली, पोलिसांनी ठोकल्या बेड्या


पुणे : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलिस स्टेशच्या हद्दित असलेले डिंभे खुर्द येथे हेमलता घोलप यांच्या शिवकृपा निवासस्थान येथे ९ जणांनी अनाधिकाराने प्रवेश करून घरातील व्यक्तिंना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ११ तोळे वजनाची सोन्याची चैन बळजबरीने ओढून घेऊन फरार झाला. 


मुख्य आरोपी युवराज दशरथ गेंगजे यास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने तसेच चार पोलिस पथकाच्या टिमने आपला जीव धोक्यात घालुन पुर आलेल्या ओढ्याच्या पाण्यात उतरुन, पाठलाग करत अरोपीस जेरबंद केले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्टपासून हा आरोपी सापडलेला नव्हता, कैलास उर्फ बापू दशरथ गेंगजे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील अरोपी डिंभे खु येथील हेमलता घोलप यांची मुले असल्याचा राग मनात धरला, त्या ९ जणांनी अनाधिकाराने प्रवेश करत घरातील व्यक्तीनां शिवीगाळ दमदाटी, धमकी देत संतोष घोलप यांच्या गळ्यातील ३ लाख ३० हजार किमतीची ११ तोळे वजनाची सोन्याची चैन बळजबरीने ओढून घेवून गेला असल्याची फिर्याद हेमलता घोलप यांनी दिली होती.

अखेर गुप्त बातमीदारामार्फत मुख्य अरोपी हा त्याच्या गावी येणार असल्याची पोलिसांना खबर लागली. त्याला शोधण्यासाठी चार पोलीसांचे पथम टीम तैनात करून जोखीम घेतली. पुर आलेल्या ओढ्याच्या पाण्यात उतरुन, पाठलाग करत अरोपीस पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. 


ही कारवाई पोना अविनाश कालेकर, जालिंदर राहणे, संदीप लांडे, दत्तात्रय जढर, संदीप रसाळ, पो. कॉ. नामदेव डेंगळे, होमगार्ड स्वप्नील कानडे यांच्या पथकाने केली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने करत आहेत.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा