Breaking


पुणे : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची महिला सरपंचाला मारहाण


पुणे : पुण्यातील कदमवाकवस्ती भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने एका महिला सरपंचाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.


पुण्यातील कदमवाकवस्ती येथील लसीकरण केंद्रातील ही घटना असून ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता आणि महिला सरपंच आहेत. त्यांना राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


 

या प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटर वरून संताप व्यक्त केला आहे, त्यांनी म्हटले आहे की, "हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे ! पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच यांना मारहाण झालीय ! मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादीचाचा! गृहखातं ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकारी गलीच्छ शिवीगाळ करणे त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे महिला सरपंचाला मारहाण करणे याचं लायसन्स दिलयं का ??" असं ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा