Breakingपुणे : गोमांस तस्करी विरोधातील नारायणगाव पोलिसांची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई !नारायणगाव / रवींद्र कोल्हे
 : "संगमनेर येथून मुंबईकडे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोत गाय - बैलांचे मांस आहे. आणि मुंबई येथे ते जाणार असल्याची खात्रीशीर माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना मिळाली.

त्यानुसार नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या मार्गदर्शनखाली पुणे नाशिक बाह्यवळण मार्गावरील पाटे खैरे मळा येथे एपीआय ताटे यांनी आपल्या पोलिस सहकाऱ्यांसह आयशर कंपनीच्या गाडीसह (क्र.एम एच- ०४ जे यू-१५६ ) ६ लाख ७५ हजार रुपयांच्या गोमांस सह आयशर टेम्पो जप्त केला असून, चालक रियाजुद्दीन मेहक खान वय २८ वर्षे, सध्या रा.माजीवाडा ब्रिजच्या खाली, झोपडपट्टी, ता.जि. ठाणे) याला अटक करण्यात आली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेरहून "गाय आणि बैलाचे मांस" वाहून मुंबई येथे जाणार असल्याची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी पुणे - नाशिक बाह्यवळण महामार्गावर पाटे-खैरे मळा येथे साफळा लावला. 

बातमी खात्रीशीर असल्याने एका आयशर कंपनीच्या टेम्पो चालक रियाजुद्दीन मेहकु खान ( वय २८ वर्षे ) याची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडे पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसतांना गोमांस कापणे आणि वाहतूक करणे बंदी असतांनाही ४ हजार ५०० किलो "गाय आणि बैलाचे मांस" सुमारे ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे गोमांस आणि आयशर कंपनीचा टेम्पोमधून वाहतूक करीत असतांना मिळून आल्याने सदर आयशर टेम्पो गुन्ह्याच्या तापासकामी अटक करण्यात आली आहे.


टेम्पो चालक खान यांचेवर महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ चे कलम ५ (क), ९(अ)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस उपअधिक्षक मंदार जवळे, यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उप निरीक्षक सुमित धनवे, पोलिस नाईक दुपारगुडे, पोलिस शिपाई.सातपुते, अरगडे, व इतर स्टाफ यांनी केली आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा