Breakingपुणे : जुन्नरला आलेला पहिला रशियन पाहुणा !


इसवी सन १४७० च्या सुमारास रशियन प्रवासी अफानासी निकितीन मुंबई च्या दक्षिणेस असलेल्या चौल बदरातून दाऱ्या घाट मार्गे जुन्नरला आला होता. त्याने जुन्नर परिसराचे व राजकारणाचे त्रोटक वर्णन दिले आहे.


अफानासी निकितीन म्हणतो की, जुन्नर शहर एका उंच खडंकावर वसलेले आहे. जुन्नर शहरात जाण्यास एकच इतकी अरूंद वाट होती की तेथून एका वेळी दोन माणसे सुध्दा जाऊ शकत नव्हती खडकाच्या पायथ्यापासून जुन्नर शहरात पोहोचण्यास एक दिवस लागे. निकितिनचा गोरा रंग पाहून घाटमावळातील स्थानिक लोकाना फार कुतूहल वाटले. अफानासी निकितीन  या रशियन प्रवाशान १४६९-१४७२ या काळात हिंदुस्थानात मनसोक्त भटकती केली आपल्या प्रवासाच वर्णन त्यान त्याला आलेल्या अनुभवासह रशियन भाषेत लिहून ठेवले आहे. 


अफानासी निकितीन च्या प्रवासाचा मूळ उद्देशहि व्यापार हाच होता. चौल, जुन्नर गावी अफनासी निकितीन ने वास्तव्य केले. चौल, जुन्नर येथील वास्तव्यात निकितीन ने जे पाहिले ऐकले अनुभवले ते सर्व सविस्तर नोंदवून ठेवलेले आहे. 

महाराष्ट्राच्या ऐश्वर्या चे वर्णन करताना त्यानी आपल्या "तीन समुद्रावरील प्रवास" या प्रकरणात केले आहे. रेवदंडा येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या सरदार रावबहादूर तेंडूलकर विद्यालयाच्या प्रांगणात एक स्मृतिस्तंभ उभा केला आहे. त्यावर हे स्मारक त्वेरा (रशिया) येथून आलेले प्रथम पथ - प्रवर्तक व व्यापारी अफानासी निकितीन यांच्या स्मृतीचा गौरव करण्यासाठी स्थापित करण्यात आलेले आहे. या प्रदेशात त्यांनी हिंदुस्थानच्या भूमीवर इ. स. १४६९ मध्ये प्रथम पाऊल ठेवले. व जणू रशिया - भारत मैत्रीच्या इतिहासाचे प्रथम उज्वल पान उघडले गेले. असे वाचायला मिळते.

- बापुजी ताम्हाणे
लेण्याद्री - गोळेगांव (जुन्नर) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा