Breaking


कन्हेरवाडी येथे राष्ट्रीय महामार्गसंबंधी विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांचे भर पावसात रास्तारोको आंदोलन


परळी : कन्हेरवाडी गावातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधीत विविध मागण्यांसाठी सरपंच राजाभाऊ फड व जेष्ठ नेते श्रीराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे.कन्हेरवाडी गावातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.548 बी मध्ये अनेक ग्रामस्थांची घरे व जागा जात आहेत. अशा ग्रामस्थांना मावेजा मिळावा, कन्हेरवाडी बाहेरील हद्दीपर्यंत चार पदरी मार्ग बनवावा, कन्हेरवाडी हे गाव बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जिरेवाडी येथील सोमेश्वर मंदिराच्या जवळ असल्याने कन्हेरवाडी येथील नदीवर ब्रिज कम केटीवेअर बंधारा बनवून भाविकांना स्नानासाठी नदीच्या बाजुने घाट उभारावेत, गावातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुने नदीपर्यंत नाले बांधकाम करावे, याबरोबरच कन्हेरवाडी येथील नादुरुस्त झालेले रोहित्र दुरुस्त करुन विज पुरवठा सुरळीत करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.


यावेळी गावचे सरपंच राजाभाऊ फड, सोसायटी चेअरमन श्रीराम मुंडे, गावचे सुपुत्र व नगरसेवक पवन मुंडे, गावचे उपसरपंच रामहरी फड, रिपाईचे नेते भास्कर रोडे, गंगाधर रोड, भगवान फड, मिनिनाथ फड, गुंडीबा फड, केरबा गवळी, भागवत फड, नाथराव फड, प्रशांत रोडे, दत्ता मुंडे, बालाजी फड, विष्णू फड, देवीदास मुंडे, नितीन मुंडे, दिलीप फड, दिलीप मुंडे, तुकाराम फड, संदीपन खांडे   शंकर शेजुळ, ज्ञानेश्वर मुंडे, ज्ञानेश्वर फड, मुंजा फड, प्रदीप मुंडे, वैजनाथ मुंडे, राज फड यांच्या सह गावातील असंख्य नागरीक उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा