Breaking

आदिवासी युवा कवी संतोष पावरा यांच्या पावरी बोलीभाषेतील दहा कवितांचा साहित्य अकादेमीत समाविष्टनंदुरबार (सुशिल कुवर) : आदिवासी बहूल नंदूरबार जिल्ह्यातील युवा कवी-साहित्यिक संतोष पावरा यांच्या आदिवासी पावरी बोलीभाषेतील दहा कवितांचा भारत सरकार साहित्य अकादेमी दिल्ली, क्षेत्रीय कार्यालय मुंबईच्या वतीने प्रकाशित होत आहे.आदिवासी एकता परिषदेचे जेष्ठ कवी साहित्यिक, वाहरु सोनवणे यांनी भिलोरी बोली भाषेला राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे शालेय, विद्यापीठ अभ्यासक्रमात आज भिलोरी कविता अभ्यासले जाते हे खूपच मोलाचे योगदान आहे. त्याच पाठोपाठ कवी संतोष पावरा आपल्या पावरी मातृ भाषेतून साहित्य लिहित आहे. त्यांचा ढोल कविता संग्रहच्या माध्यमातून पावरी बोली भाषेतील साहित्य देखील जनमानसात पोहचत आहे. आणि त्यातच आता साहित्य अकादमीच्या वतीने "आदिवासी बोलीभाषेतील कविता" या शिर्षकाने प्रा.डॉ. विनायक तुमराम यांनी महाराष्ट्रातील काही निवडक आदिवासी बोली भाषेतील कवितांचे संकलन करून त्या प्रकाशित केल्या आहेत. यात पावरा यांच्या पावरी बोली भाषेतील 10 कविता समाविष्ट करण्यात आहे. या पुर्वी देखील साहित्य अकादमीने संतोष पावरा यांना पावरी बोली भाषेला कविता वाचन साठी 3 -4 वेळा नियंत्रत केले होते. साहित्य अकादमीच्या वतीने दिलेला मान-प्रोत्साहन खुपच मोलाचे असल्यामुळे परिसरातून अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा