Breaking


मनसेच्या वतीने स्वच्छता मोहिम व सायकल रॅली


दिघी : मॅविक सायकल क्लबच्या माध्यमातुन श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र वाघेश्वर मंदिर ते श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर तब्बल 115 कि.मी. प्रवास पुर्ण केला. या पर्यावरण पूरक सायकल रॅलीतून स्वच्छता संदेश देत 'प्लास्टिक मुक्त भिमाशंकर' हा उपक्रम राबवण्यात आला.


या राॅलीची सुरुवात चर्होली चौक येथून सायकलपटूच्या टि शर्टचे आनावरण करुन उदघाटन करण्यात आले. तसेच झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.


निसर्गरम्य भिमाशंकर अभयरण्यातील व महादेव मंदिर परिसरातील घनकचरा व प्लास्टिक बाटल्या, वेपर्स पाकिटे कचरा मोठ्या प्रमाणात घोळा करण्यात आला.

या मनसे स्वच्छता सायकल रॅलीचे आयोजन मनसे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी केले होते.

या वेळी प्रमुख मनसे नगरसेवक सचिन चिखले, हेमंत डांगे, बाळा दानवले, विशाल मानकरी, शुशांत साळवी, दत्ता देवतरासे, राहुल जाधव, शिवकुमार लोखंडे, दिग्गविजय गवस, हेमंत तिवारी, इब्राइन शेख आदी मान्यंवर उपस्थित होते.


या रॅली मध्ये सायकल पटू दत्ता घुले, मयूर पिंगळे, जुनेद मुलाणी, ओकार राऊत, प्रतिक जेले, कुलदिप कोकाटे, सौरभ खोत आदी सहभागी झाले होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा