Breaking


संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, आळेफाटा येथे शिवसेनाचा मेळावा संपन्न


आळेफाटा, दि. ४ : जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत उपस्थित होते.


जुन्नर येथील कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी विविध विषयांवर भाष्य केले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "पूर्वी खंजिर खुपसने हा शब्दप्रयोग फक्त शरद पवारांवर होत होता. मात्र चंद्रकांत पाटलांना सांगतो बाबा, आम्ही समोरून कोथळा काढतो मागून नाही" असा पलटवार त्यांनी केला. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही, असेही पुढे ते म्हणाले.


राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असले तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांचे सरकार असते. सरकार आपले आहे, 'शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्यावर आहे, ही आपली पॉवर आहे' असे म्हणत शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपले आहेत, दिलीप वळसे गृहमंत्री असतील असेही मेळाव्यात बोलताना खा. संजय राऊत म्हणाले.


यावेळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख व जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा