Breaking


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उद्यापासून जमावबंदी आदेश लागू; उल्लंघन केल्यास कारवाईपुणे / रफिक शेख : राज्यात करोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सध्या राज्यात कोरोनाचा अधिक धोका वर्तवला जात असतानाच आता गणेशाचे आगमन होत आहे. या गणेशोत्सवाच्या काळात करोनाचं संकट टाळण्यासाठी पुण्यात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. 


उद्यापासून (ता. 10) जमावबंदीचा आदेश लागू असेल, तर 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत कलम 144 लागू करण्यात येईल. दरम्यान, याबाबतचे आदेश नुकतेच पुणे शहर पोलीस सहाय्यक आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी जारी केले आहेत.


हे वाचा ! त्रिपुरात माकपसह पाच मीडिया चॅनेलच्या कार्यालयावर हल्ला


कोरोनाला रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यास, तसेच संचार करण्यास मनाईचे आदेशही लागू केले आहेत. पुढचे दहा दिवस हे आदेश लागू राहणार असून याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पुणे पोलीस सहाय्यक आयुक्त डॉ. शिसवे यांनी दिला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा