Breakingसोलापूर : धनाजी साठे अंत्यसंस्कार प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई - जातीअंत संघर्ष समितीची मागणी !


सोलापूर : माळशिरस तालुक्यातील मयत धनाजी साठे यांच्या अंत्यसंस्कार बाबत अमानवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शासन करा, अशी मागणी जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.


यावेळी बोलताना जाती अंत संघर्ष समितीचे सूर्यकांत केंदळे म्हणाले, तातडीने यावर कृती घडावी अन्यथा पिडीत कुटुंबाच्या समर्थनार्थ चळवळीतील कार्यकर्ते रस्त्यावरच्या लढाईचा पवित्रा घेतील. 


यावेळी अनिल वासम म्हणाले की, पोलीस अधीक्षक सातपुते यांनी  सदर प्रकरणी पोलीस  उपअधीक्षक यांच्या मार्फत चौकशी नेमली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.  

शिष्टमंडळात जाती अंत संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष रंगप्पा मरेड्डी, अनिल वासम, बजरंग गायकवाड, सूर्यकांत केंदळे, मल्लेशाम कारमपुरी यांचा सहभाग होता. 


तर यावेळी दीपक निकांबे, तानाजी जाधव, नरेश दुगाणे, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण, मरेप्पा फंदीलोळू, शंकर म्हेत्रे, नितीन गुंजे, राजेश काशीद आदीसह उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा