Breakingएसएफआयचे महाज्योती संस्था आणि शिष्यवृत्ती बाबत राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांना बीडमध्ये दिले निवेदन !


बीड (ता.२६) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ने राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना महाज्योती संस्था आणि प्रलंबित शिष्यवृत्ती बाबत बीडमध्ये आले असता निवेदन दिले.


एसएफआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेची स्थापना २०१९ रोजी करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील व्हीजेएनटी, एनटी, ओबीसी, एसबीसी या प्रवर्गातील मागास, अति-मागास, अति-दुर्बल घटकातील संशोधक विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या संशोधनाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा संस्थेचा मूळ उद्देश आहे. हे उद्देश साध्य करण्यासाठी व संशोधक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी कटीबद्ध राहण्यासाठी एसएफआयने काही मागण्या केल्या आहे.


एसएफआयने केलेल्या मागण्या

- संशोधक अधिछात्रवृत्तीसाठी लाभार्थी संख्या वाढवून १५०० करण्यात यावी. 

- राज्यभरातील विविध विद्यापीठांमध्ये पीएचडी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच विलंब न करता त्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिपची प्रक्रिया राबवण्यात यावी. 

- विद्यार्थी प्रवेश नोंदणी पासून अधिछात्रवृत्ती लागू करण्यात यावी. 

- एमफीलच्या संधोधक विद्यार्थ्यांना सारथी, बार्टीच्या धर्तीवर विद्यावेतन देण्यात यावे. 

- महाज्योतीकडून देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात सारथी, बार्टीच्या धर्तीवर (एचआरए) व आकस्मिक भत्ता समाविष्ट करण्यात यावा. 

- एमफील आणि पीएचडी अधिछात्रवृत्ती संलग्न (इंटिग्रेटेड) पाच वर्षांकरीता देण्यात यावी. 

- स्पर्धापरीक्षा यूपीएससी व एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना मानधन देण्यात यावे. 

- प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ वितरित करण्यात यावी. 

या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.


निवेदनावर एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, जिल्हा अध्यक्ष सुहास झोडगे, जिल्हा सचिव लहू खारगे, राज्य कमिटी सदस्य संतोष जाधव व अशोक शेरकर, तालुका सचिव अभिषेक शिंदे, शंकर चव्हाण, निखील शिंदे, शिवा चव्हाण, आकाश जाधव, शरद पवार, धनंजय वाघ, अनिल पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा