Breaking


मुंबईतील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा - एसएफआय


मुंबई : मुंबईत साकीनाका येथे ९ सप्टेंबर रोजी एक महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आला. तिच्यावर उपचारादरम्यान राजावाडी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मुंबईसह महाराष्ट्र आणि देश हादरवणाऱ्या या घटनेचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ने या घटनेचा निषेध करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.


या प्रकरणी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले असल्याचे एसएफआयचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड यांनी म्हटले आहे. नुकतीच दिल्लीत घडलेली घटना, पुण्यातील वानवडी येथील आणि देशात, राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांनी देशभरात महिला सुरक्षित नसल्याने महिलांवरील अत्याचार रोखण्यास केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरल्याचे एसएफआयने म्हटले आहे.


मुंबईतील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा. महिला अत्याचाराला कायमचा आळा घालण्यात यावा, अशी मागणी एसएफआयने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा