Breaking

सोलापूर शहरातील डेंग्यू सदृश्य परिस्थिती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा - DYFI ची मागणी


सोलापूर : सोलापूर शहरात डेंग्यू सदृश्य परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत 2 मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरात कोरोना पेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. आपल्या  शहरात कोरोनाचे 34 तर डेंग्यूचे 101 रुग्ण उपचार घेत आहेत असे निदर्शनास आले आहे. यामुळे परिस्थिती गंभीर आहे असे लक्षात घेता. दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनान व लोकप्रतिनिधींना जाग येते ही बाब गंभीर आहे, असे मत माकप च्या नगरसेविका कॉ. कामिनी आडम यांनी व्यक्त केले.

 
गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी  डी.वाय.एफ.आय. जिल्हा समितीच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेविका कॉ.कामीनी आडम यांच्या नेतृत्वाखाली डेंग्यू चा प्रसार रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करावे, ही प्रमुख मागणी घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त.पी.शिवशंकर यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.


यावेळी डी.वाय.एफ.आय.चे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव अनिल वासम, राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला, सहसचिव दत्ता चव्हाण, शाम आडम, राहुल भैसे, मोहन कोक्कुल आदी उपस्थित होते.

■ निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे :
 
● शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात यावी. 

● डेंग्यू सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम उभी करावी.


● जंतुनाशक फवारणी नियमितपणे करण्यात यावी.

●दररोज सर्व भागातील कचरा नियमितपणे गोळा करावे.

● नगरसेवक यांनी आपल्या वॉर्डातील लोकांमध्ये जाणिव जागृती निर्माण करून स्वच्छतेची काळजी घ्यावी.


● डेंग्यूग्रस्त मयताच्या कुटुंबियांना किमान 10 लाख आर्थिक मदत करावी.

● महापालिका आयुक्त, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी शहर नागरिकांच्या जीवाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्वरित डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करून डेंग्यूचे निवारण करावे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा