Breaking


डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या साथीच्या रोगांना आळा बसण्यासाठी उपाययोजना करा - DYFI ची मागणी


अंबाजोगाई : डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या साथीच्या रोगांना आळा बसण्यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) च्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


   
निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहरात डेंग्यू,मलेरिया, चिकनगुनियाची साथ मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या आजारांमुळे आतापर्यंत शेकडो रुग्णांना उपचारासाठी हजारो रुपये खर्च करावे लागले आहेत. शहरात कोरोना पेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. परिस्थिती गंभीर आहे असे लक्षात येत आहे. तरी नगरपालिका प्रशासन अथवा लोकप्रतिनिधीनी नियंत्रनासाठी काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या दिसत नाही. ही बाब गंभीर आहे. 


डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. शहरातील नाली, खड्डे याबरोबरच शहरभर घरोघरी औषध फवारणी करावी. शहरामध्ये जिथे खड्डे पडले आहेत, त्यामुळे डबके साचले आहे ते सर्व खड्डे बुजावीत. कचरा गाडी वेळी - अवेळी येते त्यामध्ये सातत्य आणावे. आठवड्यातून किमान दोनदा पाणीपुरवठा करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदन देतेवेळी सुहास चंदनशिव, देविदास जाधव, प्रशांत मस्के, कृष्णा आगाव, जगन्नाथ पाटोळे उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा