Breaking


चिखली येथे शिक्षक पालक संवाद


चिखली, दि. ६ : जाधववाडी येथे शिक्षक दिनानिमित्त प्रभागात साईजीवन प्राथमिक शाळेमध्ये प्रभागाच्या नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या वतीने गुरुजनांचा आदर्श शिक्षक २०२१/२२ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 


त्यावेळी संतोष जाधव, विशाल आहेर, विनायक जाधव, तेजल जाधव, भारती जाधव, केतन जाधव, वासुदेव जाधव, मनोज आहेर, रवि जाधव  यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका मेमाणे मुख्याध्यापक वायाळ आणि इतर शिक्षक उपस्थित होते

 

संभाजीनगर येथे शिक्षकांनी साधला पालकांशी संवाद

 

कोरोनामुळे शाळा बंद, क्लासेस बंद आहेत. प्रा.दीपक जाधव आणि प्रा.वैशाली गायकवाड या शिक्षक दाम्पत्याने संभाजीनगर (चिंचवड) येथे पालक शिक्षक संवाद साधला. या कठीण काळात घरेलू महिला कामगारांसमवेत एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


वंदना काळे, सुमित्रा जाधव, वंदना उमाप, माधुरी फिरके, दर्शना शेट्टी, भरती सुतार, सुलभा सपके, मंगल शिरसाट, धनश्री सूर्यवंशी, योगेश्री सूर्यवंशी या घरेलू कामगारांना सरकारच्या योजना तसेच त्यांना शासनाच्या शैक्षणिक सहाय्य योजना आणि महिला पेन्शन योजनांची प्रा.दीपक जाधव, प्रा.वैशाली गायकवाड यांनी माहिती दिली.

 

मोशी मध्ये शिक्षक दिन

 

कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन, पोलीस आणि नागरिक मित्र यांच्या वतीने औद्योगिक तांत्रिक शिक्षक वासुदेव कळसेकर यांचा सत्कार केला. भोसरी विभाग प्रमुख शैलेश स्वामी, विशाल काळे, राजेश माने, सीमा शिंदे, स्मिता सस्ते, सागर सुपल, नितीन सस्ते यांनी एकमेकांना श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन शिक्षक दिन साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा