Breakingआदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांचा शालेय परिसरातच मुक्काम असावा - भारतीय ट्रायबल पार्टी ची मागणी


अकोले आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांचा शालेय परिसरातच मुक्काम असावा, अशी मागणी भारतीय ट्रायबल पार्टी च्या जिल्हा प्रभारी डॉली डगळे यांनी आदिवासी विकास प्रकल्प राजूरचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर अंतर्गत येत असलेल्या सर्व आदिवासी मुला मुलींच्या आश्रमशाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व इतर सुरक्षा कर्मचारी यांना चोवीस तास शाळेच्या परिसरातच व ज्या गावात दूर्गम भागात शाळा आहे. त्याच गावी मुक्कामी, निवासी राहणे बंधनकारक आहे.


अनेक आदिवासी शाळेतील शिक्षक हे शाळेच्या परिसरात व त्याच गावी न राहता इतर शहरी वस्ती असलेल्या गावी आपल्या निवासस्थानी राहतात. त्यामुळे विद्यार्थीवर कुठलेही नियंत्रण राहत नाही. तसेच अनेकदा अनुचित प्रकार देखील घडण्याची दाट शक्यता असते. 

त्यामुळे येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांचा शालेय परिसरातच मुक्काम असावे, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या सरकारी आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची मागणी केली आहे.


प्रशासन केलेल्या मागणीची अंमलबजावणी करणार का ? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा