Breaking

चांदवड नजिक नवीन टॅक्टर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, चार लाखाचे नुकसान


चांदवड (सुनिल सोनवणे) : चांदवड शिवारात मुंबई आग्रारोडवर श्री. रेणुका देवी मंदिर घाटातुन जाताना म्हसोबा मंदिराजवळ टेम्पो व नवीन टॅक्टरला आग लागुन सुमारे चार लाखाचे नुकसान झाले. शुक्रवार दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पंकज सोपान खरात रा. दुगाव ता.चांदवड हे मालेगाव मनमाड चौफुलीवरुन समर्थ टॅक्टर शोरुम मधुन कुबेटा कंपनीचा बी.2741 एच.पी.टॅक्टर हा महिंद्र कंपनीच्या मॅग्जीमो टेम्पो क्रमांक एम.एच. 19/ बी.एम. 5094 हे टाकून तो टॅक्टर नाशिक आडगाव येथे पोहच करण्यासाठी मालेगाव येथून जात असताना म्हसोबा मंदिराजवळ पाठीमागुन येणाऱ्या एका इसमाने चालक पंकज खरात यास सांगितले की, टेम्पोला पाठीमागे आग लागली.


तातडीने टेम्पो थांबवून आग विझविण्याचा प्रयत्न केला असता आग विझली नाही. तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या गाडीवाल्याने चांदवड टोल नाक्यावर टेम्पोला आग लागल्याचे सांगितले. तेव्हा चांदवड टोल नाक्याची अग्निशामक दलाची गाडी तेथे पोहचली मात्र टेम्पो व टॅक्टर शार्ट सर्किटमुळे जळून टेम्पोचे एक लाख तर नवीन टॅक्टरचे तीन लाख असे एकूण चार लाखाचे नुकसान झाले. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात जळीतांची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा