Breaking


खेड घाटात बाह्यवळण मार्गावर १५० फूट खोल दरीत कार कोसळली, चालक गंभीर जखमी


खेड / रवींद्र कोल्हे : पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर (खेड) शिवारात घाटातील  बाह्यवळण मार्गावर सोमवार ( दि.१३ सप्टेंबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एक चारचाकी कार दिडशेफुट खोल दरीत कोसळली. नाशिकच्या बाजूने पुण्याकडे जात असतांना वाहन चालक संजय मधुकर खैरनार (वय ४९ वर्ष) या चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि कार खोल दरीत कोसळली.


या बाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकहून कार क्र. (MH 15 FN 1573  ) पुण्याला जात असतांना चालक खैरनार याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि कार खोल दरीत कोसळली. या अपघातात चालक खैरनार गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


घटनास्थळी तात्काळ खेड पोलिस दाखल झाल्याने चालकाला दरीतून बाहेर काढले व उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रवाना करता आले. 

खेड पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार स्वप्नील गाढवे, संतोष घोलप, अर्जुन गोडसे, जाधव, भोईर, होमगार्ड लोखंडे, बाळा भांबुरे घटनास्थळी समक्ष जाऊन मदत कार्य सुरू केले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा