Breaking


आनंददायी बातमी : खाद्यतेल स्वस्त होणार; पहा कसे ते !


नवी दिल्ली : देशात खाद्यतेलांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. किमती कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असले तरी त्याचा फारसा फायदा झालेला नाही. कारण, आजही खाद्यतेलांच्या किमती सर्वसामान्यांच्या दृष्टीने जास्तच आहेत.


कोरोना महामारी आणि वाढत जाणारी महागाई यामुळेही तेलांचे भाव वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा स्थितीत आता देशात सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने पुन्हा एकदा पाम तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. यावेळी आयात शुल्क 5.5 टक्क्यांनी कमी केले आहे. 


देशभरात खाद्यतेलांच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. याआधी खाद्यतेलांचे दर कधीही इतके वाढले नव्हते. आता तर सणासुदीचा काळ आहे. या दिवसात तेलास जास्त मागणी असते. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करुन सरकारने पुन्हा एकदा पामतेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. याआधी मागील महिन्यात सुद्धा काही प्रमाणात तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

या निर्णयानुसार येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पाम तेलावरील आयात शुल्क 30 टक्क्यांवरुन 24.7 टक्क्यांवर आणले आहे. रिफाइंड पाम तेलावरील आयात शुल्क 41.25 टक्क्यांवरुन 35.75 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. रिफाइंड सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 45 टक्क्यांवरुन 37.5 टक्के केले आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा