Breaking

जुन्नर : मंदिरातील दानपेट्या आणि शेतकऱ्यांच्या पाणी उपसा मोटारी चोरटी लोकल क्राईम ब्रँचकडून जेरबंद !


नारायणगाव / रवींद्र कोल्हे : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील मंदिराची दानपेटी आणि शेतकऱ्यांच्या पाणीउपसा मोटारी चोरी गेल्याची फिर्याद मंचर आणि आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्याच्या सूचना पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लोकल क्राईम ब्रँच ला दिल्या होत्या.

या बाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर/आंबेगाव तालुक्यात आळेफाटा व मंचर पोलिस स्टेशन मध्ये भारतीय दंड विधान कलम ३७९ अन्वये गुन्हे दाखल झाल्याने जुन्नर/आंबेगाव तालुक्यातील पोलिस सतर्क झाले होते.


पोलिसांनी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांनी गुन्हेगारांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. गुप्त बातमीदारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जाधववाडी शिवारात शोध घेतला. मात्र आरोपींनाही पोलिसांचा संशय आल्याने चोरट्यांनी पळ काढला. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने अटक केली. त्यांची कसून चौकशी केली.

पोलिसांनी लालू बजरंग दुधवडे (वय २८ वर्ष) भरत बजरंग दुधवडे ( वय ३० वर्ष ) दोघेही रा.वनकुटे, ता.संगमनेर, जि.अहमदनगर), अनिल देवभाऊ काळे वय (२१ वर्ष) रा.भोजदरी, ता.संगमनेर, जि. अहमदनगर ) या तिन्ही आरोपींनी मंचर येथील शेवळवाडी शिवारातील ग्रामदैवत कळंबादेवी मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम चोरली असल्याची कबुली दिली.


त्याचप्रमाणे या तिन्ही आरोपींनी एक मोटारसायकल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या पाणीउपसा मोटारी, केबल आणि इतर साहित्य मिळून ७७,८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या आरोपींची कसून चौकशी केली असता, मंचर आणि आळेफाटा पोलिस स्टेशनमधील तीन  गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून मंचर पोलिस सेशनच्या ताब्यात दिले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांनी दिली.

ही कारवाई पुणे जिल्हा ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, चालक सहायक फौजदार मुकुंद कदम, पो.ह.हनुमंत पासलकर, विक्रम तापकीर,दीपक साबळे,राजू मोमीन, पो.ना.संदीप वारे, पो.कॉ.अक्षय नवले, प्रसन्न घाडगे, मित्र प्रसाद पिंगळे यांनी ही कारवाई केली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा