Breaking

आदिवासी साहित्यच्या तोंडला पुसली पानं, आदिवासी साहित्याचा पुरस्कार रद्द !


पुणे : आदिवासी साहित्याची ओळख मौखिक साहित्यातून झाली आहे. साहित्य वर्तुळात आदिवासी साहित्याची कधी दखल घेतली नाही. परंतु आदिवासी साहित्यिक लिहीते झाले. त्यांनी सलग ९ साहित्य संमेलने घेऊन आदिवासी साहित्याचा ठसा मराठी भाषेत उमटवला. तरी या साहित्याला राज्य शासनातील मराठी भाषेत स्वतंत्र वाङमय पुरस्कार नव्हता. तो मिळावा म्हणून लळित रंगभूमी ने २०१३ पासुन पाठपुरावा केला. डॉ. कुंडलिक केदारी यांच्या प्रयत्नातून 'दलित' साहित्यातून 'आदिवासी साहित्य' वेगळे केले.


स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार योजने अंतर्गत उत्कृष्ट आदिवासी साहित्याला डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने साहित्य पुरस्कार २०१७ ला निर्गमित करण्यात आला. परंतु भाषा विभागाने हा पुरस्कार थांबविला आहे.

'उपेक्षितांचे साहित्य' : लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार', वंचित, शोषित, पिडीत, कष्टकरी, अनुसुचित जाती व नव बौध्द यामध्ये आदिवासी साहित्याचा समावेश करण्यात येणार नाही.

राज्यात १९८३ पासून आदिवासी विकास विभाग आणि त्याचे स्वतंत्र बजेट, ४५ जमातींच्या ७४ बोली भाषांची वेगळी ओळख असताना आदिवासी साहित्यिकांची घोर निराशा झाली आहे. याबाबत आयुक्त आदिवासी संशोधन संस्था यांनी विशेष लक्ष घालून आदिवासी साहित्याची ओळख पुसली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आदिवासी साहित्यिक, संस्था, कलावंतांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा