Breaking

आशा व गटप्रवर्तक 'कोव्हीड भत्ता' कोरोना असेपर्यंत पुर्ववत करा, ...अन्यथा कोरोना कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा !


नाशिक : आशा व गटप्रवर्तक कोरोना असेपर्यंत 'कोव्हीड भत्ता' पुर्ववत करा, अन्यथा कोरोना कामावर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटना (आयटक) चे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी सरकारला दिला आहे.


हे वाचा ! त्रिपुरात माकपसह पाच मीडिया चॅनेलच्या कार्यालयावर हल्ला


तसेच 1 एप्रिल 2021 पासून ते आजपर्यंत आशांना दरमहा दोन हजार व गटप्रवर्तक महिलांना तीन हजार रुपये मिळणारे मानधन दिलेले नाही, ते ताबडतोब द्यावे, अन्यथा 24 सप्टेंबरपासून आशा व गटप्रवर्तक तीव्र आंदोलन करतील असेही देसले म्हणाले.


देशभर 24 सप्टेंबर रोजी सर्व योजना कर्मचारी 1 दिवसीय संप करणार आहे, त्यामध्ये आशा व गट प्रवर्तक 21 हजार रुपये किमान वेतन द्या, सामाजिक सुरक्षा द्या, भविष्य निर्वाह निधी लागू करा, आरोग्य विमा संरक्षण द्या, मोफत काम करून घेणे बंद करा आदी मागण्या करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा