Breaking


पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम व शेतकरी मेळावा, संजय काळे यांच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल


जुन्नर / रफिक शेख : स्व.शिवाजीराव महादेव तथा दादासाहेब काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करुन कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे पहा ! लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी अक्षय बोऱ्हाडेवर तिसरा गुन्हा दाखल


सविस्तर माहिती अशी की, स्व.शिवाजीराव महादेव तथा दादासाहेब काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम व शेतकरी मेळावा कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या प्रकरणी संजय शिवाजीराव काळे, दिलीप मारुती डुंबरे, रुपेश सुभाष कवडे, धनेश चुनीलाल संचे, निवृत्ती मुरलीधर काळे यांच्यावर भा.द.वि.कलम 188, 269 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती जुन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.


सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे, आमदार अतुल बेनके, संजय जगताप, अशोक पवार, दिलीप मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद सोनवणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सभापती ऍड. संजय काळे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यासह मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते.


सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधित रुग्ण आढळत आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1987 लागू करून खंड 2, 3, 4, मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी पुणे यांचा जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम व शेतकरी मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करून अटी शर्ती पेक्षा जास्त लोक जमून वरील आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हे वाचा ! ...अन्यथा आंबेगाव पंचायत समितीवर जनावरांसह मोर्चा काढू; किसान सभेचा इशारा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा