Breakingवणी : राजूर कॉलरी येथे शहीद भगतसिंग जयंती साजरी !


वणी : शोषण व अत्याचाराचे विरोधात आवाज बुलंद करून त्यासाठी लढा उभारणे हे शहीद भगतसिंग यांच्या विचाराशी जवळीकता होय", असे मत आज भगतसिंग यांच्या ११४ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात व्यक्त व्यक्त केले. 


राजूर कॉलरी येथील शहीद भगतसिंग चौकातील त्यांच्या प्रतिमेला जिजाई कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक जयंत कोयरे व सामाजिक कार्यकर्ते अश्फाक अली यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 


यावेळी महेश लिपटे, पोलीस पाटील सरोज मून, माकपचे कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, कवी-गायक राजेंद्र पुडके, राजूर विकास संघर्ष समितीचे साजिद खान, जयंत कोयरे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून मो. असलम, समीर बेग उपस्थित होते. यावेळी निलेश भगत, जब्बार, स्वप्नील डवरे, प्रकाश दाते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा