Breakingसुरगाण्यात संयुक्त राष्ट्र संघ द्वारा घोषित - जागतिक आदिवासी अधिकार दिवस उत्साहात संपन्न


आदिवासी हाच देशाचा मूळ रहिवासी - माजी आमदार जे. पी. गावित


कळवण / सुशिल कुवर : दि.१३ सप्टेंबर रोजी सुरगाणा या आदिवासी बहुल तालुक्यात अभिमानाने आपला जागतिक आदिवासी अधिकार दिवस साजरा करण्यात आला.

सर्व आदिवासी बांधव, आदिवासी बचाव अभियान, संकल्प आदीयुवा, महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नोकरदार वर्ग, उंबरठाण नागरिक, युवा-विद्यार्थी सर्वांनी एकत्र येत संयुक्तरित्या हया कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.


आदिवासी एकतेचे, संस्कृतीचे दर्शन, अस्मिता, अस्तित्व, हक्कांसाठी प्रथम उंबरठाण येथे क्रांतिवीर प्रतिमापुजन आदिवासी वाद्याच्या वादनात करण्यात आले. यावेळी सर्वांचे विशेष आदिवासी टोपी देत स्वागत करण्यात आले. सोहळ्याचे प्रास्ताविक भागवत धूम यांनी केले. 

यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर हा दिवस साजरा करण्यासाठी आपले काही बांधव दिफु आसाम येथे गेलेले आहेत. परंतु जे आपण आज स्थानिक पातळीवर आहोत त्यांनी हया दिवसाचे महत्व ओळखून एकत्र येणे गरजेचे आहे. आदिवासींचे अधिकार व युनो चा जाहिरनामा याबाबतीत माहिती दिली. कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. 


या प्रसंगी आदिवासी बचाव अभियान राज्य महिला संघटक सरोजताई भोये यांनी डांगी आदिवासी भाषेत संवाद साधत आदिवासी भाषा संस्कृती, परंपरा, चालीरीती, सन, उत्सव हे सर्वांपेक्षा आगळेवेगळे आहेत ते आपण जपले पाहिजे त्यांचे जतन, संवर्धन केले पाहिजे हे लक्षात आणून दिले.

मंचावर उपस्थित माजी आमदार जे.पी. गावित यांनी संबोधनात म्हटले की, आदिवासी हाच देशाचा मूळ रहिवासी, मालक आहे. आणि जल-जंगल-जमीन यांवर फक्त आपलाच अधिकार आहे. जागतिक आदिवासी दिन किंवा अधिकार दिवस याची दखल घेत शासनाने शासकिय सुट्टी जाहीर करावी. असे सांगितले तालुक्यातील समस्यांबाबत आदिवासींनी एकत्रित येत विविध प्रश्न सोडवणे क्रमप्राप्त आहे. सर्व आदिवासी संघटन मजबूत करावे असे प्रखरतेने सांगितले. 


परशराम पाडवी यांनी आदिम देवता, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, आदिवासींच्या समस्या, तसेच संविधानात्मक अधिकार, याबाबतीत जागृत व्हावे असे सांगितले. 

या दिवसाच्या निमित्ताने माजी आमदार जे. पी.गावित यांच्या हस्ते कार्यक्रमात तालुक्यातील 10वी (प्रथम-5) 12वी (प्रथम-5) गुणवंत विद्यार्थी तसेच आरोग्य सेवा देणारे डॉक्टर तसेच अपार मेहनत घेणारे  हिरामण थविल सह उंबरठाण रनर ग्रुप यांचा गौरव सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन केला.


तसेच विशेष सन्मान तालुक्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून कवी भावेश बागुल यांची टीम व उपस्थित नाऱ्या शॉर्टफिल्म, सुरगाणा सुरगाणा गाणे व पोरगे भात लावये येजो च्या कलाकारांचे त्यांचेच गाणे -शिंदे दिगर शाळेच्या मुलींनी अप्रतिम असे नृत्य करून सादर करत त्यांना मानवंदना दिली. आपल्या मान्यवरांच्या हस्ते कलाकार टीमचे व शाळेच्या मुलींचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देत विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी समस्त आदिवासी बांधवांसह उंबरठाण गावचे माधव पवार, माळ्या बाबा, गिरीश गायकवाड, आदि.शिक्षक संघटना राज्यध्यक्ष भागवत धूम, आदिवासी बचाव च्या सरोजताई भोये, इंजिनिअर आनंदराव भोये, संकल्प चे तालुकाध्यक्ष धर्मराज महाले, माधव चौधरी,  शिवराम देशमुखसर, तालुकाध्यक्ष भागवत चौधरी, तुकाराम अलबाड, परशराम पाडवी, मोतीराम भोये, रवींद्र गायकवाड, सोमनाथ पवार, प्रकाश पाडवी, सीताराम वळवी, गुलाब चव्हाण, नंदू देशमुख, गणेश गायकवाड, यशवंत बागुल, मूरलीधर बागुल, चंबार धुळे, राजु धुम, हिरामण गायकवाड, दिनेश पागी सह डांग सेवा उंबरठाण चे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोतीराम भोये व गुलाब चव्हाण यांनी केले. या जागतिक आदिवासी अधिकार दिनासाठी आवर्जून येणाऱ्या सर्व आदिवासी बांधव सर्वांचे तालुकाध्यक्ष भागवत चौधरी यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा