Breaking


...तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची कायम ऊसाच्या फडात पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया


मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमनला नुकतेच परदेशात शिक्षणासाठी पाठवण्यात आले. पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट करून या संदर्भात माहिती दिली आहे. या पोस्टवर आलेली एक प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.


पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवर लक्ष्मण खेडकर नावाच्या एका व्यक्तीने लिहले आहे की, "पंकजा मुंडे ह्या स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कन्या, ऊसतोड कामगारांच्या कार्यक्षम आणि संघर्षशील नेत्या, त्यांनी त्यांचा मुलगा परदेशात बोस्टनला शिक्षणासाठी पाठवलाय असी बातमी सोशल मिडीयावर वाचली, आनंद वाटला, त्या बद्दल आमच काहीच म्हणणं नाहीय, त्यासाठी एक जबाबदार आई म्हणून पंकजाताई तुमचं खुप खुप अभिनंदन आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा मुलगा आर्यमनला ही मनापासून शुभेच्छा".


"पंकजाताई, आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजूरांच्या नेत्या या नात्याने, ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजूरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का ते ही जरा पाहा, लोकांची मुंडके मोडून स्वत:ची घर भरणाऱ्या बरबटलेल्या बाकीच्या बोलघेवड्या पुढाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षा नाहीयेत, कसयं ? राज्याची नसली तरी केंद्रातली सत्ता तुमच्या हातात आहे, तुमच्या लहान भगिनी प्रितम मुंडे ह्या खासदार आहेत तुम्ही स्वतः बहुमतात सत्तेत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहात, करा काही तरी, नाही तर असं नको व्हायला की तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची कायम ऊसाच्या फडात" असं 'लक्ष्मण खेडकर' यांनी म्हटलं आहे.


यावर पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण खेडकर यांना प्रतिक्रिया दिली आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, "जरूर लक्ष्मण मी ते करेन... आम्ही पहिल्यांदा अमेरीका इथे आलो ते ही ऊस तोडणारी विमल (तेव्हा ते ऊसतोड कामगार होते) आणि तश्याच लढण्यास तयार राहून यश मिळवणार्‍या सख्या घेऊन... आता त्या योजनेचे चित्र बदलले असावे मी इंचार्ज नाही राहिले. प्रत्येकाची लढाई भिन्न असते कोणाची जगण्याची आणि कोणाची जगवण्याची, मी अनेक ऊसतोड मजुरांना त्यांच्या मुलाच्या शिक्षण घेण्यासाठी मदत करत होते, करते आणि करत राहणार... गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मधून गरजूंच्या शिक्षणाला मदत, आपत्ती ग्रस्त संसाराला मदत, रुग्णांच्या ईलाजासाठी मदत, कोव्हिडं १९ मध्ये कोव्हिडं सेंटर, पूरग्रस्त लोकांसाठी मदत फेरी, हे सर्व वंचित आणि शोषित यांच्यासाठी करणे म्हणजे जगणे आहे आणि कष्ट आणि मेरिट यांची सांगड घातल्या शिवाय काहीही नाही होऊ शकत" असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा