Breaking...तर पेट्रोल ७५ रुपये आणि डिझेल ६८ रुपये लीटर होणार ! मुळ किंमत किती ते पहा !


नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारवरील रोष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर आज वस्तू आणि सेवा कर ( जीएसटी ) परिषदेच्या 45 व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या सूचनेवर चर्चा करू शकतात. 

यावरून पेट्रोल जीएसटी अंतर्गत आल्यास ते 28 रुपयांनी आणि डिझेल 25 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 110 आणि डिझेल 100 रुपयांच्या पुढे आहे.


1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू झाला तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यांच्या महसुलाच्या दृष्टीने कच्चे तेल, नैसर्गिक वायू , पेट्रोल, डिझेल आणि एटीएफला जीएसटीच्या कक्षेतून बाहेर ठेवले होते. यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या ठिकाणी वेगवेगळे कर लावतात आणि त्यातून येणारा पैसा सरकारी तिजोरीत जातो. 

पेट्रोल आणि डिझेलवर किती कर आहे ? 

आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 101.19 रुपये आणि डिझेलची किंमत 88.62 रुपये प्रति लीटर आहे. येथे तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की या पैकी अर्ध्याहून अधिक रक्कम कंपन्यांना नाही, तर कर स्वरूपात केंद्र आणि राज्य सरकारकडे जाते.


आज रोजी दिल्लीत पेट्रोलचे दर 

मूळ किंमत / Ex कारखाना किंमत 40.78
रुपये मालवाहतूक ( कन्व्हेयन्स शुल्क ) 0.32 रुपये 
उत्पादन शुल्क 32.90 रुपये 
डीलर कमिशन 3.84 रुपये 
व्हॅट ( डीलर कमिशनसह ) 23.35 रुपये
तुमच्यासाठी किंमत 101.19 रुपये 

आज रोजी दिल्लीत डिझेलची दर

मूळ किंमत / Ex कारखाना किंमत 40.97 रुपये 
मालवाहतूक ( वाहतूक शुल्क ) 0.30 रुपये
उत्पादन शुल्क 31.80 रुपये 
डीलर कमिशन 2.59 रुपये
व्हॅट ( डीलर कमिशनसह ) 12.96 रुपये
तुमच्यासाठी किंमत 88.62 रुपयेकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा