Breaking


लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी अक्षय बोऱ्हाडेवर तिसरा गुन्हा दाखल


जुन्नर / रफिक शेख : अक्षय बोऱ्हाडे प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. खंडणी प्रकरणानंतर पत्नी रुपाली बोऱ्हाडे हिने गुन्हा नोंदविल्यानंतर पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अक्षय बोऱ्हाडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.अक्षय बोऱ्हाडे याच्यासह सोनू व रोशन यावर भा.द.वि.कलम 376, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


हे पहा ! पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम व शेतकरी मेळावा, संजय काळे यांच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल


सविस्तर वृत्त असे की, अक्षय बोऱ्हाडे याने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जुन्नर येथील लॉजवर नेऊन दोन वेळा बलात्कार केला. तसेच तू जर कोणाला काही बोलली तर तुझा काटा काढू असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.


या प्रकरणी पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.


हे वाचा ! ...अन्यथा आंबेगाव पंचायत समितीवर जनावरांसह मोर्चा काढू; किसान सभेचा इशारा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा