Breaking


जुन्नर तालुक्यात आज (ता.१९) आढळले १२ करोनाचे रुग्ण


जुन्नर, ता.१९ : जुन्नर तालुक्यात करोनाच्या रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. राज्य सरकारने देखील विविध प्रकारचे निर्बंध मागे घेण्यास सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.


जुन्नर तालुक्यात आज (ता.१९) १२ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये नारायणगाव ६, ओझर २, वारुळवाडी १, हिवरे तर्फे नारायणगाव १, खोडद १, पिंपरी पेंढार १ असा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा