Breaking


मुंबईत एका उंच इमारतीला भीषण आग, १९ व्या मजल्यावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरातील "अविघ्न पार्क" या ६० मजली इमारतीला आग लागली होती. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली होती त्यानंतर या आगीने आणखी काही मजले काबीज केले होते मात्र ही आग अटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.


करी रोड येथे अविघ्न पार्क ही ६० मजली इमारत आहे. या इमारतीमधील १९ व्या मजल्यावर सकाळी ११.५१ च्या सुमारास भीषण आग लागली होती. सुरुवातीला ही आग लेव्हल ३ ची आग असल्याचे जाहीर केले होते. मात्र नंतर उंचावरील वाऱ्यामुळे आग आणखी वाढल्याने ही आग लेव्हल ४ ची असल्याचे जाहीर करण्यात आले.


 

एका व्यक्तीचा मृत्यू


अविघ्न पार्कमधून १९ व्या मजल्यावरून एक व्यक्ती खाली पडून मृत्यू झाला आहे. अरूण तिवारी असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचं वय ३० वर्षं असल्याची माहिती प्रशासनाने दिली. आगीमुळे बाहेर पडता येत नसल्याने तिवारी इमारतीच्या १९ व्या मजल्याच्या गॅलरीत लटकलेले होते. पण हात सुटल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भातील व्हीडिओ व्हायरल झाला आहे.सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक


मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी "अविघ्न पार्क" इमारत ही एक मानली जाते. ही इमारत एकूण ६० मजली असून या ठिकाणी अनेक उच्चभ्रू लोक राहतात. या इमारतीतील घरांची किंमत १३ कोटींच्या जवळपास असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, अविघ्न पार्क या इमारतीला आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र. इमारतीत काही काम सुरू होते आणि त्यावेळी आगीची ठिणगी उडून ही आग लागली असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा