Breaking

चिखलीत दोन दिवसीय मोफत रक्त तपासणी शिबीर संपन्नपिंपरी, (ता.२३) : जाधववाडी, चिखली, मोशी भागातील नागरिकांसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व दत्तदिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगल जाधव आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या माध्यमातुन मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी बोलताना राहुल जाधव म्हणाले कि, करोनाच्या या काळामध्ये आणि बदलत्या वातावरणातील बदलामुळे लोकांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच रक्त तपासण्या करण्यासाठी लोकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात, लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, म्हणून आपल्याकडून हि लोकांना काही प्रमाणात मदत करण्याच्या हेतूने दोन दिवसीय (२३,२४ ऑक्टोबर) रोजी शिबिर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पहिल्याच दिवशी ४०० नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली.


यावेळी राहुल जाधव, मंगल जाधव, आशा आहेर, संभाजी घारे, महेंद्र मंडलिक, बाबु जाधव, गुलाब जाधव, नंदकुमार जाधव, बाबु वाळूजकर, चिंतामणी शिंदे, प्रताप भांबे इ. मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा