Breakingअजय निटुरे यांना 'रविज' सामाजिक संस्थेकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान


सुरगाणा (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यातील जि.प.शाळा सुर्यगड येथील उपक्रमशील शिक्षक अजय निटुरे यांना रविज सामाजिक संस्था, म्हसरूळ, नाशिक यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.


अजय निटुरे हे अतिशय उपक्रमशील शिक्षक आहेत. मागील सहा वर्षापासून ते आपल्या शाळेत 'मिशन नवोदय' हा उपक्रम राबवितात. आजपर्यंत त्यांच्या १७ विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय खेडगावला प्रवेश मिळाला आहे. तसेच ते आपल्या शाळेत 'मिशन एकलव्य रेसिडेंन्सी स्कुल' हा उपक्रम राबवितात. आत्ता पर्यंत त्यांच्या ४० विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेंन्सी स्कुलला प्रवेश मिळाला आहे. तसेच 'मिशन स्कॉलर' उपक्रमांतर्गत त्यांचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.


कोविड काळात आदिवासी बहूल भाग असल्यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे पालकांकडे मोबाईल नाहीत. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत ओट्यावरची शाळा, मंदिरातील शाळा, शिक्षक आपल्या दारी हे उपक्रम राबवून आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले. 


अजय निटुरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षण अधिकारी धनंजय कोळी, बीट विस्तार अधिकारी संजय कुसाळकर, भाऊसाहेब सरक, केंद्रप्रमुख देवचंद जाधव, मुख्याध्यापक सुनिल सोनवणे, शिक्षक सगम गावित, निला जगताप, सोनू देवरे, सरपंच मनोहर राऊत, भागवत देशमुख, भागवत राऊत, सचिन राऊत, नारायण जाधव, दिपक गवळी, किसन देशमुख, भरत जाधव यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा