Breaking
अकोले : राष्ट्रवादी पदवीधर संघाचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन


अकोले : राष्ट्रवादी पदवीधर संघ अकोले तालुका संघटनेच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे "पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पदवीधारांच्या विविध मागण्या लवकर पूर्ण व्हाव्यात म्हणून निवेदन देण्यात आले.

 
पालकमंत्री मुश्रीफ यांनी अकोले विधानसभा मतदारसंघात दौरा झाला. यावेळी महाराजा लॅान्स, अकोले या ठिकाणी झालेल्या सभेत महाराष्ट्र पदवीधर संघाचे प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष सुशिलकुमार चिखले, अकोले शहराध्यक्ष राहुल पानसरे,तालुका उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, प्रसिद्धी प्रमुख संदीप म्हशाळ, उपाध्यक्ष डॉ.विजय रंधे, बाळू साबळे यांनी तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पदवीधरांचा मनातील खंत व्यक्त केली.

या वेळी स्वतः पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब" यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार तरुण पदवीधरांच्या संदर्भात विविध खात्यातील विभागांमध्ये चर्चा करुन लवकरच या सर्व गोष्टी प्रत्यक्ष अंमलात येतील असा मानस त्यांनी ठेवलाय व पदवीधर तरुणांच्या योजनेसाठी लवकरच तरतुद करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुश्रीफ यांनी दिले.

या सर्व गोष्टीचा पाठपुरावा आपल्या अकोले तालुक्याचे लाडके "आमदार डॉ.किरण लहामटे" करणार आहेत, असे मुश्रीफ म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा