Breaking


आंबेगाव : आदिवासी भागात सुमारे १०६ कुटुंबाना परसबाग बियाणे वाटप


आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात घराशेजारी परसबाग निर्माण करण्यासाठी आदीम संस्था व अखिल भारतीय किसान सभा प्रयत्न करीत आहे. नुकतेच गोहे बु. गावातील दांगटवाडी, उपळवाडी, आनंदवाडी, गाडेकरवाडी व करपाटी वस्ती या ठिकाणच्या सुमारे १०६ कुटुंबाना सेंद्रिय परसबागेसाठी परसबागेचे बियाणे वाटप करण्यात आले.


परसबागेसाठी देशी बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी दिपा मोरे यांनी विशेष सहाय्य केले. परसबाग विषयक बियाणे बीज प्रक्रिया लागवड याविषयी सविस्तर मार्गदर्शन आदीम संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे आणि अनिल सुपे यांनी उपस्थित महिलांना केले. ऍनिमिया मुक्तीसाठी सेंद्रिय पालेभाज्या यांचे आहारातील महत्त्व याविषयी सोप्या भाषेत माहिती उपस्थित महिलांना संस्थेचे कार्यकर्ते यांनी यावेळी समजावून सांगितली.

परसबागेविषयक सविस्तर माहिती व त्याविषयक जाणीवजागृती विषयक अभ्यास साहित्य, प्रशिक्षण हे सहाय्यक ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून आदीम संस्थेस उपलब्ध होत आहे.

या परसबाग बियाणे वाटप कार्यक्रम प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव सीताराम जोशी, आदीम संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे, अनिल सुपे, किसान सभेचे अशोक पेकारी, विठ्ठल सुपे, मंगेश जोशी, विजय दांगट इ.उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे स्थानिक संयोजन किसान सभेचे निवृत्ती भवारी, मंगेश जोशी, विठ्ठल सुपे तर एसएफआय संघटनेचे महेश गाडेकर, प्रदीप जोशी यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा