Breaking

आंबेगाव : अन्नसुरक्षा कायदा विषयक प्रशिक्षण यशस्वी संपन्नआंबेगाव : अन्नअधिकार कायदा व त्याअंतर्गत नागरिकांना मिळालेले विविध हक्क याविषयी समाजात पुरेशी जाणीव-जागृती दिसून येत नाही. त्यामुळे रेशनव्यवस्था, मध्यान्ह भोजनव्यवस्था किंवा अंगणवाडीतील पोषण आहारव्यवस्था असेल याचा फायदा समाजातील शेवटच्या घटकाला अनेक वेळा दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर NCAS संस्था पुणे, NFI संस्था, दिल्ली व आदिम संस्था आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने न्हावेड ता. आंबेगाव जि.पुणे येथे रेशनव्यवस्था अंगणवाडीत मिळणारा पोषण आहार व शाळेत मिळणारा मध्यान्ह भोजन आहार याविषयी एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.


या प्रशिक्षणात किसान सभेचे राजु घोडे यांनी उपस्थितांना पेसा कायदा त्याअंतर्गत गावातील विविध समित्यांची कार्ये व नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आणि हक्क याविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्त्या सुनिता गांधी यांनी अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या विविध योजना व योजनांवर देखरेख करणाऱ्या समित्या व या समित्यांची रचना व कार्य याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले.


नागरिकांना अन्नसुरक्षा प्रदान करणारा कायदा निर्माण होऊन ही त्याच्या अंमलबजावणी विषयक  काही अडचणी दिसून येतात. उदा. रेशन खराब येणे, रेशन नियमित न मिळणे, पुरेसे रेशन न मिळणे, दक्षता समित्या सक्रिय नसणे, अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या पोषक आहारात भ्रष्टाचार होणे यासारखे अनेक, प्रकार विविध ठिकाणी, वारंवार घडून येताना दिसतात.


यासाठी अन्नसुरक्षा कायदा, सर्वसामान्य लोकांना समजून सांगून, त्यांना आपले हक्क व जबाबदारी विषयक अवगत केल्यास या कायद्याच्या अंमलबजावणी मधील अडथळे कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा यावेळी सप्तमी यांनी व्यक्त केली.


या प्रशिक्षणास तिरपाड, डोण, नानावडे, नाव्हेड, पिंपरगणे, कोंढरे, आघाणे व आहुपे या गावांतील ६० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास NCAS संस्थेच्या सप्तमी, स्नेहा प्रभा, किसान सभेचे राजु घोडे, आदीम संस्थेचे, अविनाश गवारी, बाळकृष्ण गवारी, दिपक वालकोळी हे उपस्थित होते. प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन बाबुराव आंबवणे यांनी तर प्रस्ताविक अविनाश गवारी यांनी केले.


समारोपीय सत्रात प्रशिक्षणार्थीचे मनोगत संदिप काठे व महिला बचतगट प्रतिनिधी यांनी मांडले, व शेवटी पुंडलिक असवले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे स्थानिक नियोजन नाव्हेड गावातील युवक, महिला व ग्रामस्थांनी व किसान सभेच्या स्थानिक कार्यकर्ते यांनी केले होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा