Breaking


आंबेगाव : आदिवासी तरुणांनी व्यवसायाभिमुख व्हावे - ट्रायबल फोरमचे अध्यक्ष डॉ. हरीष खामकर


आंबेगाव : आदिवासी तरुणांनी व्यवसायाभिमुख व्हावे, असे प्रतिपादन ट्रायबल फोरमचे अध्यक्ष डॉ. हरीष खामकर यांनी केले. आंबेगाव तालुक्यातील कोंढवळ येथे ट्रायबल फोरम आंबेगावच्या कार्यकारणीची बैठक संबोधित करतेवेळी ते बोलत होते.


पुढे बोलताना खामकर म्हणाले, "प्रामुख्याने ठाकर, कातकरी, कोळी महादेव या आदिवासी समाजातील जमातींसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी व विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. सरकारी नोकऱ्या व त्यामधील आरक्षण जवळपास संपले आले असून तरुणांनी  व्यवसायाभिमुख व्हावे त्यासाठी ट्रायबल फोरमच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील."
 
त्यावेळी तालुका कार्याध्यक्ष दिपक चिमटे म्हणाले, आदिवासी भागातील आर्थिक शैक्षणिक व रोजगार या विषयांवर भर देण्यात येईल. भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्य असून समाजात द्वेष भावना पसरवणाऱ्या धार्मिक व संस्कृती सांगून जातिभेद करणाऱ्या संघटनांकडे दुर्लक्ष करून वैज्ञानिक व आधुनिक विचारसरणीचा अवलंब करून आदिवासी माणसाच्या प्रगती तसेच उन्नतीसाठी ट्रायबल फोरम आंबेगाव तालुक्यात काम करणार आहे, असेही चिमटे म्हणाले.

त्याप्रसंगी गोहे खुर्द चे सरपंच अंकूश कंरवदे यांची शेतकरी फोरम च्या तालुका अध्यक्षपदी, तळेघरचे उपसरपंच सुहास रोंगटे यांची शेतकरी फोरमच्या कार्याध्यक्षपदी, पोखरीचे उपसंरपच सचिन भागीत यांची युवक कार्याध्यक्षपदी, फलोदेचे उपसरपंच मनोहर मेमाणे यांची युवक महासचिव, उगलेवाडीचे उपसरपंच शंकर शिंगाडे यांची शिनोली शाखा प्रमुखपदी, अनिल कारोटे यांची कोंढवळ गावांदेवाडीच्या शाखाप्रमुखपदी, किरण केदारी तेरूगंण गावच्या शाखाप्रमुखपदी, ज्ञानेश्वर विरणक यांची ढगेवाडी शाखाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

त्यावेळी तेथील तरूणवर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानेश्वर विरणक, अनिल कारोटे, किरण केदारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रायबल फोरमचे महासचिव विशाल दगडे यांनी केले तर प्रास्ताविक ट्रायबल फोरमचे मार्गदर्शक मारुती तळपे यांनी केले. तालुक्याचे उपाध्यक्ष सोमनाथ गेंगजे यांनी कार्यक्रमांचे आभार मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा